नंदगाव जि प गटातून भाजपाचे एडवोकेट प्रवीण पवार निवडणूक आखाड्यात उतरणार
———————
धाराशिव (सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातून येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून एडवोकेट प्रवीण पवार हे निवडणूक आखाड्यात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
एडवोकेट प्रवीण पवार हे आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक तसेच कायदेविषयक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, शेतकरी, युवक व महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांची नंदगाव परिसरात स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. प्रवीण पवार यांनी पाटील तांड्यात जलस्वराज प्रकल्पाच्या माध्यमातून गाव पातळीवर अनेक विकासात्मक कामात सक्रिय सहभाग नोंदवून अनेक विकास कामे केली आहे. पवार हे शासनाच्या श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकिय सदस्य असून या योजनेच्या माध्यमातून देखील तांड्याचा विकासासाठी सतत प्रयत्न करीत असत.भाजपाकडून सक्षम, अभ्यासू आणि जनसंपर्क असलेला उमेदवार देण्यावर भर देण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर प्रवीण पवार यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. नंदगाव जिप गटात विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रवीण पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून “सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रभावी आवाज उठवणे हेच माझे ध्येय असेल,” अशी प्रतिक्रिया प्रवीण पवार यांनी बोलताना केले. पक्षाने संधी दिली तर संधीच सोनं करणार असेही शेवटी बोलताना केले
विरोधी पक्षांकडूनही तयारी सुरू असून नंदगाव जिप गटातील निवडणूक यावेळी चुरशीची होण्याची शक्यता आहे.




