अणदूर जिल्हा परिषद गटातून उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून डॉ. जितेंद्र कानडे निवडणूक रिंगणात उतरणार
—————-
धाराशिव ( सतिश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून डॉ. जितेंद्र कानडे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून याबाबत सकारात्मक हालचाली सुरू असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.डॉ. जितेंद्र कानडे हे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात सक्रिय असून सर्वसामान्य जनतेशी त्यांचा थेट संपर्क आहे. युवक, महिला व शेतकरी वर्गातही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणदूर जिल्हा परिषद गटावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून मजबूत व स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देण्याची भूमिका पक्षाने घेतल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. कानडे यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून विविध बैठकांचा, जनसंपर्क दौऱ्यांचा आणि स्थानिक प्रश्नांवर पाठपुराव्याचा सपाटा लावला आहे. स्थानिक पातळीवर रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या प्रश्नांवर डॉ. कानडे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. “सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्य प्रयत्न करत असतात. विरोधी पक्षांकडूनही या गटात तयारी सुरू असून निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. मात्र, डॉ. जितेंद्र कानडे यांना मिळणारा वाढता जनसमर्थन पाहता उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला या गटात चांगली संधी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आता सर्वांचे लक्ष पक्षाच्या अधिकृत घोषणेकडे लागले असून उमेदवारी निश्चित झाल्यास आणदूर जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.




