समर्थ क्लासेसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील समर्थ क्लासेसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रा. मोटेगावकर सर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी प्रा. मल्लिनाथ लंगडे सर, पत्रकार संजय रेणुके, शिवशंकर तिळगूळे, प्रशांत किलजे व बालाजी पाठक हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. मोटेगावकर सर यांनी रामशेट्टी सरांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्थ क्लासेसने राबविलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. शिस्तबद्ध अध्यापन, गुणवत्तावाढीवर भर आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी घेतले जाणारे सातत्यपूर्ण प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिनदर्शिकेच्या उपयुक्ततेबद्दल प्रशंसा व्यक्त केली.




