अणदूर प्रतिनिधी :-
अणदूर येथील बसस्थानक ते खंडोबा मंदिर हा प्रादेशिक विकास अंतर्गत पूर्ण झालेल्या महत्त्वपूर्ण विकास कामाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि.१ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात करण्यात येणार असून ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तथा माजी सभापती ॲड. दिपक आलूरे यांनी आज दिनांक २८ रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन तुळजापूर तालुक्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपाचे नेते सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे नेते सुनील चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
पर्यटन विकासाच्या दृष्टीने एकूण एक कोटी 99 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून 1 कोटी 66 लाख रुपयांचा अत्यंत आकर्षक रुंद दर्जेदार रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगून 33 लाख रुपयातून अयोध्येच्या धरतीवर अत्याधुनिक पथदिव्यांचे उभारणे करण्यात आले. या रस्त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याचे सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष दीपक घोडके, माजी सरपंच धनराज मुळे, दयानंद मुडके, प्रवीण घोडके, लक्ष्मण बोंगरगे सह मान्यवर उपस्थित होते.
- Advertisement -




