धाराशिव ( सतिश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून आगामी नंदगाव जिल्हा परिषद गट निवडणुकीसाठी भाजपाचे दिलीप तात्या सोमवंशी हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सोमवंशी यांनी यापूर्वीही सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली असून, त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे नंदगाव गटात निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. दिलीप तात्या सोमवंशी हे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व युवा नेते सुनील चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक होते. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात प्रकाश चव्हाण, जनार्दन वाघमारे, विश्वनाथ कलशेट्टी.व दिलीप तात्या सोमवंशी त्यांच्या पत्नी छायाबाई यांना या मतदारसंघातून विजय हस्तगत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. युवा नेते सुनील चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करताच. दिलीप तात्या सोमवंशी यांनी देखील भाजपात प्रवेश केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगाव जिल्हा परिषद गटातील गाव तांडे वाड्या वस्तीचा सर्वांगीण विकास केला. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांचा शासनावरील पकड आणि प्रदीर्घ अनुभवामुळे तरुण कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे त्यांचे प्रमुख बळ मानले जाते. दिलीप सोमवंशी हे भाजपात प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षसंघटन, विकासकामे, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमदार राणाजगदीतसिंह पाटील व युवा नेते सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगाव जि प गटातील गावागावात जाऊन प्रचाराची धुरा सांभाळली आहे.या भागातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. नंदगाव जिल्हा परिषद गटात भाजपाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने सोमवंशी यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक कार्यकर्ते व समर्थकांमध्ये त्यांच्या नावाला मोठा प्रतिसाद मिळत असून, “विकासाचा चेहरा” म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या संदर्भात बोलताना दिलीप सोमवंशी यांनी सांगितले की, “पक्षाने संधी दिल्यास नंदगाव गटातील जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवून सर्वांगीण विकासासाठी काम करेन.” भाजपाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी सोमवंशी यांच्या हालचालींमुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.




