spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जळकोटला बोरी धरणातून पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचा जलजीवन च्या अधिकाऱ्याकडून कडून सर्वे

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

जळकोट गावास जलजीवन मिशन अंतर्गत
बोरी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या कामास प्रारंभ करण्याच्या दृष्टीने आज बोरी धरण परिसरात प्रत्यक्ष सर्व्हे करण्यात आला. हे जल जीवन मिशन अंतर्गत असलेले काम गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. यामुळे अनेक दिवसापासून गाव पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. हे काम लवकरात लवकर होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार करून कामाची सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या सर्वे वेळी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण, धाराशिव येथील एक्झिक्युटिव्ह अभियंता नागदे साहेब, कार्यकारी अभियंता जाधव साहेब, महेश बप्पा कदम, जळकोट ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, गुत्तेदार दीक्षित, तसेच सर्व्हे कर्मचारी मयूर व मुकेश ग्रामपंचायत कर्मचारी लहू कारले, मल्लिनाथ डांगे हे सर्व बोरी धरणाच्या साइटवर प्रत्यक्ष उपस्थित होते.
या पाणीपुरवठा योजनेमुळे जळकोट गावाचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. बोरी धरणातून पाईपलाईनद्वारे शुद्ध व मुबलक पाणी गावात आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून, योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून बोरी धरणाचे पाणी जळकोट ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सरपंच श्री. गजेंद्र कदम पाटील यांनी यावेळी दिली. ही योजना पूर्ण झाल्यानंतर जळकोट गावातील नागरिकांना नियमित, शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा मिळणार असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू होणाऱ्या या कामामुळे जळकोट गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या