spot_img
-0 C
New York
Wednesday, February 4, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पार्वती कन्या प्रशाला, जळकोट येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पार्वती कन्या प्रशाला येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. प्रथमत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.लता सोमवंशी-कदम या होत्या,आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवतेच्या हितासाठी घालवले .समता, शिक्षण आणि न्याय या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र डॉ. आंबेडकरांनी दिला. आजचा दिवस त्यांच्या या महान कार्याला स्मरण करण्याचा आहे. त्यांनी दुर्बल, शोषित मागासलेल्या घटकांना उभा करण्यासाठी शिक्षणाचा महामंत्र दिला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थी कु.गायत्री राजमाने कु.राजनंदिनी जाधव .कु.आदिती माने कु.कृष्णा कदम कु.संस्कार कदम कु.सायली हिंडोळे,कु.प्रणिता लोखंडे,कु.ओम कदम कु. आदित्य कदम यांनी भाषणे केली. यावेळी प्रशालेतील शिक्षक श्री. विजय मोरे श्री बसवराज मडोळे श्री अभिमन्यू कदम श्रीम. सुजाता होटकर श्रीम. रोहिणी तळेकर श्री सचिन गुडड् उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. शुभम कदम व कु. आदर्श बिराजदार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या