spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जळकोट उबाठाचे अध्यक्ष संतोष वाघमारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

(आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थित संतोष वाघमारे यांनी भापजमध्ये प्रवेश केला.)

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जळकोट शहराध्यक्ष संतोष वाघमारे व शहापूरचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे गटप्रमुख बाळासाहेब वाघमारे यांनी आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. संतोष वाघमारे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जळकोट विद्यमान शहरअध्यक्ष आहेत. विद्यार्थी दशेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आतापर्यंत पक्ष कार्य केले आहे. त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शहापूर गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे बाळासाहेब वाघमारे यांनीआपल्या अनेक कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये दाखल झाल्याने आगामी निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी आशिष सोनटक्के, मल्लिनाथ गावडे, अरविंद पाटील यांनी प्रयत्न केले.

Reply

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या