spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ : शिवसेनेच्या प्रचार रॅलीला शहरातील नागरिक, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

धाराशिव प्रतिनिधी : –

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्यावतीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करताना शिवसेनेने प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 8 मधील अधिकृत उमेदवारांना जनसमर्थन मिळवून देण्यासाठी जोशात घोषणा देत रॅली काढली.रॅलीची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवसैनिकांच्या उत्साही गर्दीत पार पडली.
या प्रचार रॅलीस मराठवाडा युवती प्रमुख आकांक्षा ताई चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत शिवसेना नेहमी जनतेच्या पाठीशी राहिल्याचे सांगितले.रॅलीला मार्गदर्शन आणि नेतृत्व तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी केले.
प्रभाग निहाय उमेदवारांची उपस्थिती होती यामध्ये प्रभाग क्रमांक 1 अ मधून उमेदवार सुनिता प्रभाकर पाटील,प्रभाग क्रमांक 2 अ मधील उमेदवार मीनाताई सोमाजी,प्रभाग क्रमांक 2 (ब) मधील उमेदवार अजिंक्य खंदारे,प्रभाग क्रमांक 8 अ सुनिता अविनाश रसाळ, प्रभाग क्रमांक 8 ब मधून सुनील हनुमंतराव घाडगे मधून सर्व उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या उत्साहात रॅलीत सहभागी झाले.नागरिकांशी संवाद साधत त्यांनी प्रभागातील विकासकामांचा ध्यास जपण्याचे आश्वासन दिले.
यामध्ये शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे,शहर संघटक नितीन मस्के यांसह असंख्य शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
रॅली दरम्यान संपूर्ण शहरात घोषणांचा नारा, भगवे झेंडे आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले. निवडणूक प्रचाराची धमक वाढवणारी ही रॅली तुळजापूरमध्ये चर्चेचा विषय ठरली असून शिवसेनेची निवडणुकीतील शक्ती प्रकट करणारी ठरली.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या