spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

केशेगाव येथे विद्युत तारेच्या शॉट सर्किट मुळे उभा असलेला ऊस जळुन भस्मसाद.

शेतकरी दत्तात्रय शिवाजी शिनगारे यांचे ऊस जळाल्या मुळे लाखो रुपयांचे नुकसान
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
महावितरणच्या विद्युत पोलची तार तुटल्याने शेतकऱ्याच्या उसाची राख
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
इटकळ (दिनेश सलगरे):-

तुळजापुर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील शेतकरी दत्तात्रय शिवाजी शिनगारे यांच्या शेतातील विद्युत तार तुटल्याने शॉट सर्किट झाल्यामुळे उभा असलेला दोन एकर ऊस जळुन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान ही घटना रविवार दि.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केशेगाव शिवारात घडली. मिळालेली अधिक माहिती अशी की, मौजे केशेगाव येथील शेतकरी दत्तात्रय शिवाजी शिनगारे यांची गट नंबर ३७५ मध्ये शेत जमीन असून जवळपास दोन एकर ऊस अगदी जोमात व तीस कांड्यावर आलेला होता दोन दिवसातच ऊसाची तोड करायची होती पण रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी शिनगारे यांच्या शेतातील विद्युत तार तुटली आणि शॉट सर्किट झाल्या मुळे मोठा जाळ झाला आणि उभ्या असलेल्या दोन एकर ऊसासह दोन एकर ड्रिप ही जळून भस्मसात झाली घटनेची माहिती मिळताच लाईनमन बोरमन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली.यावेळी शेतकरी दत्तात्रय शिवाजी शिनगारे, मुरलीधर शिनगारे, बाबुराव शिनगारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्याचे खरीप सोयाबीन पाण्याने वाहून गेले व त्यात या महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचा उभा असलेला ऊस व दोन एकर ड्रीप ही जळाला त्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.तरी या शेतकऱ्यास महावितरण कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी येथील शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या