spot_img
3.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जि.प.प्रशाला जळकोट येथे बालकांच्या हस्ते बालदिन उत्साहात साजरा

 

धाराशिव न्युज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला जळकोट येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आली. बाल दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे सर्व विद्यार्थ्यांनीच केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती बिराजदार तर प्रमुख पाहुणे जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा केलेला आरुष बिराजदार, जैद बागवान, वैभवी पिसे, परमेश्वर कुंभार हे विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे उपस्थित विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्पाची उधळण करीत व्यासपीठावर विराजमान केले. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष , प्रमुख पाहुणे असणाऱ्या बालचिमूने केले. त्यानंतर शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या पुढील विद्यार्थ्यांनी भाषण केली. विपुल पिसे,आरव यादव, योगेश कदम, शरद कुंभार, विश्वनाथ माळगे, धीरज पाटील, सोहम लष्करे, आरुष बिराजदार, सुरज साळुंखे,वैभवी पिसे,समृद्धी कदम, स्वाती काडते , लक्ष्मी कुंभार, सोहम कुंभार, सागर सरवदे, जैद बागवान, श्रुती कांबळे, अध्यक्षीय भाषणांनी आरती बिराजदार हिने समारोप केला. कार्यक्रमानंतर पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारा गोड पदार्थ युक्त देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा कदम व आदिती यादव तर सर्वांचे आभार मोहिनी कुंभार हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष सारणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र डावरे सर, पुष्पलता कांबळे, जयराम शिंदे, संगीता आडे , बसवराज पुरंत, समाधान पवार, वैष्णवी कदम, यांनी सहकार्य केले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या