spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

केशेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मल्लीनाथ महाबोले यांची बिनविरोध निवड.

निवडी नंतर नूतन उपसरपंच मल्लिनाथ महाबोले यांचा ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार.
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मल्लीनाथ महाबोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी नंतर गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण ग्रामस्थांचा जल्लोष.या विशेष सभेचे अध्यक्षस्थान सरपंच मल्लिनाथ आप्पाराव गावडे यांनी भूषविले. निवड प्रक्रिया विस्तार अधिकारी डि. एस. नडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामसेवक तांबोळी यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकमताने मल्लीनाथ महाबोले यांची उपसरपंच म्हणून निवड केली.ग्रामपंचायत सदस्यांमध्ये लक्ष्मण नागनाथ क्षिरसागर, शंकर सिद्राम घंटे, मल्लिनाथ गंगाराम महाबोले, सौ. सविता मारुती पवार, सौ. प्रभावती धोंडीबा जाधव, श्री. महिबुब इस्माईल फकीर, सौ.अश्विनी प्रदीप हुकीरे आणि सौ. शोभा कमलाकर बागडे यांचा सहभाग होता.या निवड कार्यक्रमाला माजी उपसरपंच लक्ष्मण क्षिरसागर, पद्माकर जेवळे, युवा नेते शिव हुकिरे, तसेच समाजिक कार्यकर्ते गणेश कुताडे हे मान्यवर उपस्थित होते.तसेच शिवानंद बिराजदार, चिदानंद हदराळे, योगीनाथ जळकोटे, मल्लीनाथ जळकोटे, केदार ऊमाटे, प्रकाश साखरे, कल्याणराव पाटू , मारुती पवार, दयानंद महाबोले, उमेश महाबोले, जाकीर फुलारी, अज्जू नदाफ, दीपक पाटू यांच्यासह समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करीत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. उपस्थित मान्यवरांनी नुतन उपसरपंच मल्लीनाथ महाबोले यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.निवडीनंतर मल्लीनाथ महाबोले यांनी भावना व्यक्त करत सांगितले की,ग्रामपंचायतीच्या या बिनविरोध निवडीमुळे केशेगावमध्ये विकासाची नवी दिशा सुरू होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. मल्लिनाथ महाबोले यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाल्याने गाव परिसरातून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या