धाराशिव (सतीश राठोड ) :–
हिंदी की चादर गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमाच्या नांदेड येथील कार्यक्रमास राज्यातील बंजारा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन उद्योजक तथा धर्मरक्षक किसन भाऊ राठोड व
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख तथा या कार्यक्रम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
16 नोव्हेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या उपस्थितीत ‘ शहीदी समागम ‘ सोहळा नांदेड शहरातील असर्जन भागातील विशाल मैदानावर संपन्न होणार आहे. शीख समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या सचखंड गुरुद्वारामुळे ओळखले जाणारे नांदेड हे शहर एका भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार ठरणार आहे . या कार्यक्रमाचे महत्त्व केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक एवढ्यापुरतेच मर्यादित नसून ,भारतीय समाजातील एकात्मता , सौहार्द आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने तो अत्यंत मोलाचा ठरेल गुरु तेगबहादुर साहिबजी , सिख समाज तसेच बंजारा समाज यांनी देव धर्म देश आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे भारतीय इतिहासातील अद्वितीय आणि प्रेरणादायी उदाहरण आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या ऐतिहासिक समारंभातून लकीशा बंजारांच्या त्यागमय इतिहासाचा गौरव होणार आहे शिख आणि बंजारा समाजाच्या त्याग , बलिदान , शौर्य , पराक्रम व गौरवशाली परंपरेला नवी उजळणी मिळणार आहे. या ऐतिहासिक समारंभासाठी हिंद की चादर गुरु तेगबहादूर साहिबजी शहिदी समारंभ समिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्य समितीचे सदस्य धर्मनेते भगवंत सेवक किसनभाऊ राठोड व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख तथा या कार्यक्रम समितीचे समन्वय रामेश्वर नाईक यांनी बंजारा लभाना शिख समाजातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे . तर धाराशिव जिल्हा सह मराठवाड्यातील तमाम बंजारा बांधवांनी या ऐतिहासिक समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकीय सदस्य तथा
या कार्यक्रम समितीचे निमंत्रित सदस्य प्रवीण पवार धाराशिव चे अशासकीय सदस्य संतोष चव्हाण,विलास राठोड,अतुल राठोड यांनी केले आहे.



                                    
