धाराशिव प्रतिनिधी :-
धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. तसेच मुंबई येथे संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन होणार्या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा सत्कार धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक सुधीर (अण्णा) पाटील, धाराशिव शहप्रमुख आकाश कोकाटे उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींची निवडणूक स्वबळावर लढवावी की महायुतीकडून याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. दोन महिन्यांवर निवडणुका आल्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्यातून पक्षश्रेष्ठींची भूमिका काय असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांतजी शिंदे यांची भेट घेवून या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.



                                    
