तुळजापूर प्रतिनिधी :- ( दि.18 ) चंद्रकांत हगलगुंडे
अतिवृष्टी व पुरामुळे डॅमेज झालेल्या सोयाबीनला हमीभाव देण्याची मागणी तुळजापूर तालुक्याचे युवा नेते तथा दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशनचे संचालक सुनील चव्हाण यांनी मुख्यमंत्री ना .देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अतिवृष्टी व ढगफुटी सदृश धुवाधार पावसाने बळीराजा पूर्णतः उघडा पडला आहे. जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतकरी हतबल झाला असून पिके पाण्यात बुडाल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन डॅमेज झाले आहे. अशा परिस्थितीत व्यापारी वर्ग सोयाबीन बेभावाने खरेदी करत असून शेतकऱ्यांचे निसर्गाबरोबरच व्यापाऱ्याकडून लूट होत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सोयाबीनला नाफेडमार्फत खरेदीस परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे. डॅमेज सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही नसून अशावेळी शासनाने पुढाकार घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्रावर निश्चित दर ठरवून डायमें सोयाबीनचे खरेदी तातडीने सुरू करावी अशी मागणी केली आहे. ही मागणी तातडीने मंजूर झाल्यास हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.



                                    
