spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग महाविद्यालयात मुले व मुलींच्या कुस्ती स्पर्धचा फड गाजणार

धाराशिव ( सतिश राठोड ) :-

नळदुर्ग कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन मुले, मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
कुस्ती स्पर्धा २०२५ चे आयोजन ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान नळदुर्ग येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले असून मुले व मुलींच्या कुस्ती स्पर्धचा फड गाजणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण यांच्या हस्ते तर मराठवाडा विभागाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ क्रिडा विभागाचे संचालक डॉ.सचिन देशमुख, ऑलंपिक संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रजित जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेती कु. गौरी शिंदे, पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्यासह संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास गावातील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या