spot_img
9.6 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग महाविद्यालयाला ग्रीन क्लब मधील महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार

धाराशिव ( सतीश राठोड ) :-

 

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील ग्रीन क्लब विभागाने केलेल्या पाणी बचती संदर्भाने केलेल्या कार्याला महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त पटकाविले आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या Youth Engagement and Water Stewardship (YEWS) 2023-2025 या उपक्रमांतर्गत जाहीर करण्यात आलेले विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा दिनांक २९.९.२०२५ वार सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेला होता. पुरस्कार वितरण सोहळा मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर , अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मा गोपाल रेड्डी, युनिसेफ चे प्रमुख कबीर युसूफ , सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ सुनील भिरुड,तंत्र शिक्षण विभाग सहसंचालक मा श्री दत्तात्रेय जाधव, विभागीय सहसंचालक मगर व आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सिओईपी (COEP- Technological University) तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर, पुणे (पूर्वीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय महाविद्यालय, पुणे येथे पारितोषीक वितरण संपन्न झाला.जागितक जलदिन(२२ मार्च) निमित्त आयोजित महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रीन क्लब, उत्कृष्ट पोस्टर व उत्कृष्ट शॉर्ट व्हिडिओ/रील, उत्कृष्ठ ग्रीन कलब समन्वयक अशा संयुक्तपणे घेतलेल्या स्पर्धेमध्ये नळदुर्ग महाविदयालयाने महाराष्ट्र शासनाचे एकूण पाच पारितोषीके मिळवलेले आहेत त्यामध्ये उत्कृष्ठ ग्रीन क्लब- राज्यस्तरीय प्रथम, उत्कृष्ठ ग्रीन क्लब- जिल्हास्तरीय प्रथम, पाणी बचत शार्ट व्हिडीओ/ रील- जिल्हास्तरीय द्वितीय, पाणी बचत पोस्टर- जिल्हास्तरीय तृतीय, उत्कृष्ठ ग्रीन क्लब समन्वयक- जिल्हास्तरीय प्रथम असे ग्रीन क्लब कार्यातील जागतिक जलदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धाचे मानकरी ठरणारे नळदुर्ग हे एकमेव महाराष्ट्रातील महाविद्यालय ठरले. याप्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड ग्रीन क्लब समन्वयक,डॉ उध्दव भाले, ग्रीन क्लब सहसमन्वयक,डॉ निलेश शेरे, कार्यालयीन अधिक्षक श्री धनंजय पाटील उपस्थित होते. याबद्दल प्राचार्य डॉ राठोड, ग्रीन क्लब समन्वयक डॉ. भाले, सहसमन्वयक डॉ निलेश शेरे, डॉ हंसराज जाधव यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगावकर ,संस्थेचे सर्व संचालक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या