धाराशिव (सतीश राठोड ) :-
धाराशिव जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असुन ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे तरी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यास प्रति हेक्टर 50 हजाराची मदत द्यावी आशी मागणी धाराशिव टायगर ग्रुप संघटनेच्या वतिने जिल्हाधिकारी याच्याकडे केली आहे.
टायगर ग्रुप संघटनेचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठे प्रमाणात कहर केल्याने धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक जनावरे दगावली आहेत. तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वडनेर सोनारी देवगाव या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने आनेक शेतकऱ्यांचे जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. भूम शहरासह तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबियाचे प्रचंड नुकसान झाले आहेत. उमरगा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मुरूम शहरात आनेक कुटुंब्याच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबीय रस्त्यावर येऊन बेघर झाले आहेत धाराशिव तालुक्यातील तेरणा धरण भरल्यामुळे तेरणा नदी काठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहेत तर कांदा सोयाबीन उडीद यासह अन्य पिके पाण्यात वाया गेली आहेत . जिल्ह्यातील शेतमजुरांना अतिवृष्टीमुळे रोजगार उपलब्ध न झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे तरी शासनाने शेतकऱ्यास प्रति हेक्टर 50 हजार तर शेतमजुरास दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी टायगर ग्रुप चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. देण्यात आलेल्या निवेदनावर टायगर ग्रुप तुळजापूरचे गोविंद देवकर यांच्या स्वाक्ष-या आहेत.




