धाराशिव (सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पाटील तांडा येथे घटस्थापनेचे औचित्य साधून भागवताचार्य युवा कीर्तनकार हभप मोहनदासजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली असता नागरिकांनी त्यांचा जंगी सत्कार केला.
प्रारंभी येथील श्री संत सेवालाल महाराज व आई जगदंबे मंदिरात होम हवन करून महाआरती करण्यात आली. यावेळी हभप मोहनदासजी महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर बंजारा भाषेत प्रवचन केले. तसेच मंदिरात जय आंबे,बोलो जय जगदंबे हे भक्ती गीत सादर करून उपस्थित भक्तगण तल्लीन झाले होते.
देशभक्ती व समाज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे राष्ट्रीय युवा नेते येथील युवक राहुल चव्हाण यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील बंजारा युवकांच्या समस्यांची ते सतत सोडवणूक करीत असतात. त्यांच्या एकंदरीत सामाजिक कार्याचे ह भ प मोहनदासजी महाराज यांनी कौतुक केले. मोहनदास महाराज यांनी येथील मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना बसण्यासाठी मॅट भेट दिली. याप्रसंगी देशभक्ती व समाजसेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे राष्ट्रीय युवा नेते राहुल चव्हाण, तांड्याचे नाईक एडवोकेट संजय राठोड, कारभारी हरी पवार, ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार , ताराबाई पवार, सुधीर राठोड , अनिल फुलचंद पवार , पोपट राठोड , नागेश पवार , राम राठोड , संजय राठोड , अनिल बाबुराव पवार ,सुरेश पवार विलास पवार , भालचंद्र राठोड ,विकास राठोड , संदीप राठोड,संतोष चव्हाण , आप्पाराव राठोड, सह ग्रामस्थ महिला उपस्थित होते.




