धाराशिव ( सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने पुराचे पाणी घरात घुसल्यामुळे अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य पाण्यात तर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. लोकांनी अक्षरशः रात्र जागून काढले आहेत.
खुदावाडी सह परिसरात मध्यरात्री पावसाने धुमाकूळ घातला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला पुराचा पाणी अक्षरशः गावांना पाण्याने वेढलं तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी देखील गावात शिरलं साठे नगर धनगर वस्ती सह अन्य भागातील अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने ग्रामस्थ महिला लहान लहान मुले भयभीत झाले होते. घरातील संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजल्याने येथील कुटुंबप्रमुख हतबल झाले आहेत. तरी एकीकडे या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकाचे प्रचंड नुकसान देखील झाले आहेत तरी शासनाने खुदावाडी येथील पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या कुटुंबीयांच्या घराचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे तर खुदावाडी सह परिसरातील शेतकऱ्यांचे देखील रात्रीच्या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. विहिरीत गाळ गेले आहेत तरी शासनाने हातबल झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे व विहिरीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. शासनाने पंचनामे करून संबंधित नुकसानग्रस्त कुटुंबीयास आर्थिक मदत न दिल्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा लहुजी शक्ती सेना धाराशिव जिल्हा युवा अध्यक्ष रामजी गायकवाड यांनी बोलताना माहिती दिली.



                                    
