धाराशिव न्युज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे राहणारे सामान्य कुटुंबातील कैकाडी समाजाचे भानुदास मारुती माने यांची नात, नातू डॉक्टर रोहन माने (मुंबई) तसेच आता 2025 मध्ये झालेल्या नीट परीक्षा मध्ये रोहित अमोल माने, रितिका अजित माने, यांनी चांगले मार्क्स घेऊन वैद्यकीय शिक्षणासपात्र झाले असून रोहित माने याचा शासकीय महाविद्यालय मिरज येथे तसेच रितिका माने हिचा बीडीएस कॉलेज परभणी येथे प्रवेश मिळाल्याने त्यांचा जळकोट येथे फेटा, शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेषत: एकाच कुटुंबातील तीन- तीन डॉक्टर होण्याचा आदर्श कैकाडी समाजापुढे तयार केल्याने उबाठा गटाचे तुळजापूर तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे यांनी त्यांच्या परिवाराच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील वैद्यकीय शिक्षणास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कृष्णात आण्णा मोरे, सुरेंद्र मोरे ,आजोबा भानुदास माने, अमोल माने व मित्रपरिवार उपस्थित होता.