नळदुर्ग प्रतिनिधी :-(निजाम शेख)
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे मंगळवार (दि.१९) रोजी जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट छायाचित्रकारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या हस्ते छायाचित्रकारांना सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ फोटोग्राफर धनराज साखरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे राजेश कटकधोंड, रविंद्र गोग्गी, बालाजी पवार, बालाजी माने, कुलदीप चव्हाण,मेघराज किलजे हे होते.
यावेळी कोअर कमेटी सदस्य प्रसाद देशमुख, महेबुब शेख, संजय कुंभार, अनिल जाधव,संतोष व्हटकर, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष निजाम शेख, उपाध्यक्ष शिवानंद खुने, सचिव गणेश जवळगे, कार्यवाहक अलीम शेख, कार्याध्यक्ष नितीन गायकवाड, कोषाध्यक्ष शुभंक मायाचारी, सहसचिव किरण कांबळे,लक्ष्मण दुपारगुडे,शिवाजी धुते, श्रीकांत लोहार,किशोर वाघमारे,सुनिल दिक्षित,अक्षय पाटील,विशू बोंगरगे, भैय्या मोरे, रमेश दबडे,सौरभ जाधव,नागेश बिराजदार, सुजित ठाकुर, गोविंद राठोड, स्वप्निल मोटे, युवराज जाधव,विशाल धुते, महमंद इनामदार,दिनेश पाटील,सचिन व्हटकर,किशोर दबडे,मारूती बनसोडे, तुकाराम कुंभार यांच्यासह आदि उपस्थित होते.