spot_img
18.5 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजाभवानी मंदिर गाभारा कळस काम 30 दिवसात अहवाल सादर करा – सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या सुचना

धाराशिव प्रतिनिधी :-

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा भक्कम आशीर्वाद पाठीशी आहे. आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानेच मंदिर जीर्णोद्धाराचे अभुतपुर्व काम पूर्णत्वास जाणार आहे. त्यासाठी तुळजाभवानी देवीचे महंत, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष, पुजारी बांधवही उत्स्फूर्तपणे तयारआहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. आशिषजी शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जीर्णोद्धारासाठी एकोप्याने काम करण्यावर शिक्कामोर्तब झाले. आई तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने या निर्णयाचे सर्वांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
बैठकीस तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा गुरु बजाजी बुवा, मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार, मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर-कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, पुजारी मंडळाचे अध्यक्ष, पुजारी सचिन परमेश्वर- कदम, अनुप कदम, विधीज्ञ शिरीष कुलकर्णी, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ना. श्री. आशिषजी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या महत्त्वपूर्ण बैठकत सर्व कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांची, आय.आय.टी. तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरले आहे. पुढील 30 दिवसांच्या आता त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या