spot_img
15.4 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

ऋजुता बिराजदार शिक्षणासाठी स्टॉक होमला रवाना

 

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर :- विजय पिसे जळकोट

 

 

जळकोट येथील निवृत्त अभियंता मल्लिनाथ आडव्यप्पा बिराजदार यांची नात ऋजूता बिराजदार ही

उच्च शिक्षणासाठी स्वातंत्र्यदिनी स्टॉकहोमला प्रयाण करणार आहे.

 

ऋजुता हिने २०२४ मध्ये मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. मास्टर्ससाठी तयारी करत असताना तिने युजर एक्सपीरियन्स डिझायनर म्हणून नोकरी स्वीकारली. पुढील शिक्षणासाठी तिला केटीएच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्विडनमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिने इंटर ॲक्टिव्ह मीडिया टेक्नॉलॉजी हा कोर्स निवडला आहे. इंजिनिअरिंग ज्ञानासोबत डिझाईनची आवडही जपणारा आणि वापरकर्त्यांसाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास मदत करणारा एक परफेक्ट कोर्स ऋजूताला करता येणार आहे. सध्या बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी स्वयंसेवी कार्यामध्ये ती सहभागी आहे. ऋजूताने सोलापूर विद्यापीठाकडे आतापर्यंतचे प्रोजेक्ट्स एकत्र करून एक डिझाईन पोर्टफोलिओही तयार केला. तिने आयईएलटीएस परीक्षाही दिली आणि तिला सीआरईएफ स्केलवर सी १ हा दर्जा मिळाला आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या