उमरगा प्रतिनिधी :- (ज्ञानेश्वर गुरुव)
१५ ऑगस्ट रोजी राज्यात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा किंवा मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याबाबतचे परिपत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने जारी केले आहे. या शासन निर्णयाचे समस्त वारकरी संप्रदाय ने शासनाचे आभार मानले आहेत.
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती आहे. यापार्श्वभूमीवर सुपतगाव येथील हनुमान भजनी मंडळाचे वारकरी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मारुती मंदिरात भजन करून संपूर्ण गावातून माऊलींची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भजनी मंडळं,टाळकरी, बालवारकरी, भाविक भक्त उपस्थित होते.