धाराशिव ( सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील टेलर नगर काटगाव येथील उंच डोंगरावरील महादेव मंदिरात शिवभक्ताने हर हर महादेव बम बम भोलेच्या जयघोषात श्रावण मास निमित्त तिसऱ्या सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती .
400 वर्षांपूर्वीचे पुरातन जागृत महादेव मंदिर आहे . येथील निसर्गरम्य परिसर पाहून मंदिर परिसरात आल्यानंतर जणू काय दुसरे शिखर शिंगणापूर महादेव मंदिर आहे अशी प्रतिक्रिया शिवभक्तातून केली जात आहे. तुळजापूर ते अक्कलकोट महामार्गावर टेलर नगर येथील उंच टेकडीवर निसर्गरम्य परिसरात पुरातन महादेव मंदिर आहे . टेलर नगर पासून मंदिराकडे जाणारा रस्ता व टेकडीवर मंदिराकडे शिवभक्तांना जाण्यासाठी शेकडो फरशीच्या पायऱ्या हे लोकसभागातून शिवभक्तांनी केली आहे तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व मंदिरासमोर पत्र्याचा सभा मंडळ शिवभक्तांनी उभा केला आहे . सद्गुरु शिवराम बुवा महाराज दिंडेगावकर यांच्या कृपेने गुरुवर्य नागनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 18 ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण मास यात्रेनिमित्त दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी महादेव मंदिरात पहाटे महाअभिषेक , सकाळी दहा वाजता काल्याचे किर्तन , कुमार सागर स्वामी महाराज लोहारेकर यांचे कीर्तन सेवा देखील आयोजित करण्यात आले आहे तरी परिसरातील शिवभक्तांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन नागनाथ महाराज व मंदिर कमिटीचे शिवभक्त सुरज बचाटे, गणेश स्वामी , तुकाराम बनसोडे , कुमार घोडके , तुकाराम ढाले ,गणू खोबरे , दिनेश चेंडके सह शिवभक्तानी केली आहे . महाप्रसाद शिवअग्रो इटकळ यांच्यातर्फ करण्यात आला आहे . महामार्गावरील टेलर नगर पासून मंदिरापर्यंत दर्शनासाठी जाणाऱ्या भावीक भक्तांसाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी येथील डांबरीकरण रस्त्याची सोय करावी दिनांक 18 रोजी श्रावण सोमवारी महिलांची व महाविद्यालयीन मुलींची मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते अनुचित प्रकार घडू नये याकरिता नळदुर्ग पोलिसांनी मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावे अशी मागणी शिवभक्तांकडुन केली आहे.