spot_img
29.3 C
New York
Wednesday, August 13, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर नप ने सार्वजनिक बंद शौचालय व कचराकुंडी हटवा -अन्यथा अमरण उपोषण

  • तुळजापूर प्रतिनिधी :-

तुळजापूर शहरातील हैदराबाद बँके शेजारी मंगळवार पेठ भागात सुरज बाळासाहेब जगताप यांच्या घरासमोर असलेले बंद सार्वजनिक शौचालय व कचराकुंडी मोडकळीस आलेली आहे याचा त्रास होत असून तुळजापूर नगर परिषदेने सदर शौचालय व कचराकुंडी हटवा अन्यथा 14 ऑगस्ट रोजी पासून नगरपरिषद तुळजापूर समोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुरज बाळासाहेब जगताप यांनी दिला आहे .
यासंदर्भात सुरज जगताप यांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , आयुक्त ,जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक , नगरपरिषद यांना लेखी निवेदन दिले आहे . देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , या भागातील जवळपास अनेक कुटुंबीयांनी वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता नगरपरिषद तुळजापूर यांच्याकडून रुपये 15 000 घेतलेले आहेत त्यामुळे सदरील बंद पडलेले शौचालय व कचराकुंडी काढून त्या ठिकाणी चांगले उद्यान नगरपरिषदेने बांधावे व त्यामध्ये लहान मुलांसाठी उद्यानामध्ये खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी ठेवावी .लोकांना फिरण्यासाठी ट्रॅक उभारण्यात यावा जेणेकरून शहराच्या सौंदर्यात भर पडेल . नगरपरिषद तुळजापूरच्या संबंधित अधिकाऱ्याने बंद पडलेले मोडकळीस आलेले सार्वजनिक शौचालय व कचराकुंडी पाडण्यात यावे अन्यथा 14 ऑगस्ट 2025 पासून नगरपरिषद कार्यालय तुळजापूर समोर अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा सुरज बाळासाहेब जगताप यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या