धाराशिव न्यूज रिपोर्टर:- विजय पिसे जळकोट
दिनांक 1 ऑगसट 2025 वार शुक्रवार रोजी श्री कुलस्वामिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा जळकोट व राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जळकोट तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात “ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी ‘साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.संतोष चव्हाण साहेब,प्रमुख पाहुणे श्री. कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय आशा पवार मॅडम व श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव सर श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक खंडेराव कारले सर व प्रा सुरेश कोकाटे सर , कांबळे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते लोकशाहिर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संतोष दुधभाते सरांनी केले .व आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विषयी वीस विद्यार्थ्यांनी भाषण केले.
श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेचे विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री किरण कांबळे सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना सखोलपणे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संतोष चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अण्णा भाऊंना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पण ते खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली. व लोकमान्य टिळका विषयी सखोल माहिती सांगितले. व शेवटी भाषण केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले*
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बिळेणसिद्ध हक्के सर यांनी केले व उपस्थितांचे आभार श्री. कुमारी मयुरी कांबळे मॅडम यांनी मानले यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.