अणदूर प्रतिनिधी :-
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्था व केशेगाव येथील संभव प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध सामाजिक कार्य,कला,पत्रकारीता, शैक्षणिक, पोलीस प्रशासन, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा स्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे
या सोहळ्यासाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,माजी मंत्री उत्तमप्रकाशजी खंदारे,उमरग्याचे आमदार प्रविणजी स्वामी, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णुभाऊ कसबे,माजी जि प सदस्य दिपक जवळगे,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामचंद्र आलुरे, जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी,माजी प्राचार्य संगमेश्वर जळकोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
—————————————-
नगीनाताई कांबळे, बजरंग ताटे, ईश्वर क्षीरसागर, शिवाजी गायकवाड, अशोक जाधव, विकास कसबे,जोशीलाताई लोमटे,किसन देडे,मिनाक्षीताई पेठे,रुपेश डोलारे, युवराज शिंदे,अहेमद शेख, राजीव कसबे, पांडुरंग घोडके,भारत गायकवाड,अरुण लोखंडे, डॉ किशोर जोगदंड,एस के गायकवाड, दादासाहेब बनसोडे,सुनिताताई भोसले, किशोर जाधव, लक्ष्मण क्षीरसागर, चंद्रकांत कांबळे, बालाजी गायकवाड, ॲड विलास साबळे, यांचा पुरस्कारांने सन्मान होणार आहे
—————————————-
हा पुरस्कार ९ ऑगस्ट रोजी इटकळ येथील साई मंगल कार्यालय येथे संपन्न होणार असल्याचे आयोजक दयानंद काळुंके व तुकाराम क्षीरसागर यांनी कळविले आहे