उमरगा / प्रतिनिधी :- ( ज्ञानेश्वर गुरव)
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या 54 वा वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कदेर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय जनता पार्टीचे उमरगा तालुकाध्यक्ष सिध्देश्वर माने, सरचिटणीस विठ्ठल चिकुंद्रे तसेच युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमाजी मंडले, स्वास्तिक विवेक कलशेट्टी, साईनाथ भीम दिक्षित, यशपाल कांबळे,सुशिलकुमार शिंदे, विवेकानंद चौधरी, तंटा मुक्त अध्यक्ष महादेव साखरे,बापुसाहेब काळे, प्रविण सुर्यवंशी, विठ्ठल गायकवाड या मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.पुस्तक वही पेन त्याचबरोब मिष्ठान्न जलेबी, पारले बिस्किट, खाऊ वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभार गोविंद तर आभार प्रदर्शन सगर प्रदिपकुमार यांनी केले.कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्रीमती औरादे, जोगे, प्रशांत पाटील, पुजारी रतन आदि मान्यवर उपस्थित होते.