उमरगा / प्रतिनिधी :-
तालुक्यातील सुपतगाव येथील वारकरी संप्रदायतील,पांडुरंगाचे भक्त, मंदिरातील पालखीचे नेणारे सेवेकरी काशिनाथ शंकर झुरळे यांचे मंगळवारी (दि.22 )सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
हनुमान भजनी मंडळातील चोपदार भिमा झुरळे यांचे ते वडील होत.त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायवर शोककळा पसरली आहे.अंत्यसंस्कार बुधवारी दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चायात दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.