धाराशिव प्रतिनिधी – (सतिश राठोड ) :-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बंजारा समाजाची पवित्र काशी पोहरादेवी मंदिरात बंजारा धर्मगुरूंनी महाआरती करून मंदिर परिसरात वृक्ष लागवड केली .
श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना सह अन्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील बंजारा तांड्याचा सर्वांगीण विकास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातून व्हावेत. येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला मोठे यश मिळो अशी प्रार्थना करीत महाआरती करीत साकडे घालत बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराजांचे वंशज पोहरादेवी चे धर्मगुरू विधान परिषदेचे सदस्य महंत बाबूसिंग महाराज व महंत जितेंद्र महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . वाढदिवसाचे औचित्य साधून भक्तीधाम पोहरादेवी मंदिर परिसरात वृक्ष लागवड देखील करण्यात आले . याप्रसंगी सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकीय सदस्य , भाजपाचे युवा नेते, आंतरराष्ट्रीय हिंदू सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण पवार , नांदेड येथील आश्रम शाळेचे संस्थापक सचिन राठोड,धाराशिव येथील आश्रम शाळेचे संस्थापक दयानंद राठोड सह महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते .