धाराशिव प्रतिनिधी :-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल ९१० रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. समाजहिताला प्राधान्य देत कोणताही अनावश्यक खर्च टाळून राबवलेल्या या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील १९ मंडळांमध्ये हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. कळंब तालुक्यातील मकरंद पाटील, दत्ता साळुंखे, अरुण चौधरी, भूम तालुक्यातील संतोष सुपेकर, बाबासाहेब वीर, वाशी येथील राजगुरू कुकडे, परंडा तालुक्यातील उमाकांत गोरे, अरविंद रगडे, तुळजापूर तालुक्यातील रंजना राठोड, महादेव जाधव, बसवराज धरणे, तसेच उमरगा तालुक्यातील नीरजानंद अंबर, सिद्धेश्वर माने, साईराज टाचले आणि लोहारा तालुक्यातील राजेंद्र पाटील यांनी मंडळ अध्यक्ष म्हणून उत्साहाने सहभाग घेत या सामाजिक उपक्रमाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण भागातील वाचनालये, तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात ही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ९१० नागरिकांनी रक्तदान करत समाजाप्रती आपले योगदान दिले.