पालकमंत्री सरनाईक यांचा जंगी स्वागत
———————
धाराशिव ( सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग वसंतनगर येथील कुटुंबप्रमुखांनी राहत असलेली घर जागा मालकी हक्क नोंद करून मिळावे याकरीता धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांना निवेदन दिले आहेत .
हरित धाराशिव अभियान अंतर्गत वृक्षारोपण व विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर
आले असता तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे पालकमंत्री सरनाईक यांची समाजसेवक सुरेश राठोड व कारभारी विनायक जाधव सह ग्रामस्थ महिलांनी सदिच्छा भेट घेऊन नागरी सत्कार करीत सदर मागणीचे निवेदन दिले.वसंतनगर येथील बंजारा समाजातील नायक कारभारी व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन नळदुर्ग नगर परिषद दप्तरी घर जागेची मालकी हक्क नोंद करून आठ अ नक्कल मिळावे याकरिता गेल्या अनेक वर्षापासून नळदुर्ग नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे परंतु जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केली आहे .घर जागा मालकी हक्क नोंद करा या मागणी करिता येथील ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता यापुर्वी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात नगरपरिषदेसमोर आंदोलन , उपोषण देखील केली आहेत.येथील कुटुंबप्रमुखांच्या घर जागेची मालकी हक्क नोंद नसल्याने शासकीय योजनेचा वैयक्तीक लाभ घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत. तरी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी या भागातील कुटुंब प्रमुखांच्या घर जगा मालकी हक्क नोंद करून आठ अ नक्कल मिळवून द्यावी व येथील ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे .याप्रसंगी वसंतनगर नळदुर्ग येथील समाजसेवक सुरेश राठोड , कारभारी विनायक जाधव , सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ राठोड , जेतालाल राठोड , महावीर चव्हाण , सुशीलाबाई जाधव , कलावती राठोड , गुणाबाई जाधव , शांताबाई जाधव , भारताबाई राठोड , सुनिता पवार सह ग्रामस्थ महिला उपस्थित होते .