धाराशिव न्यूज: रिपोर्टर विजय पिसे जळकोट
सन १९९३च्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्य प्रलंयकारी भुकंपात धाराशिव जिल्हयातील उमरगा- लोहारा तालूक्यातील अनेक गांव जामिनदोस्त होऊन अनेक बालकांचे आई वडिल दगावल्याने असा अनाथ झालेल्या बालकाना अधार देण्यासाठी राष्ट्रसेवा दलाच्या माध्यतून जेष्ठ समाजवादी नेते भारतिय संविधनाचे अभ्यासक पन्नालाल भाऊ यांच्या पुढाकारातून आलियाबाद नळदुर्ग येथ बाघाट पर्वत रांगेच्या ओसाड माळरानावर आपल घर बालकाश्रमाची निर्मिती करून . अनाथ मुलाना अधार देणाचे तेंव्हा पासून ते आजतागायत फार मोठे सामाजिक कार्य करणारे ९३ वर्षीय पन्नालाल भाऊ सुराना म्हणजे अनाथाचा नाथ आहेत.तेंव्हा आपल घर येथिल विद्यार्थानी स्वतःला कधिही अनाथ समजूनये असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे मराठवाडा विभाग कार्याध्यक्षक आनंद पांडागळे यानी आपल घर येथे आयोजित कार्यक्रमात बोलाताना केले.
विद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आईचे छत्र हरवलने आईविना अनाथ झालेले, रिपाइं (आठवले ) पक्षाचे नुतन तालूका अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे राज्य कार्यकारणी सदस्य जळकोट ता.तुळजापूर येथील अरुण लोखंडे यांचे पिताश्री कै. नारायाण तुकाराम लोखंडे यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने आदरांजली सभा आणि आपल घर नळदुर्ग येथिल शालेय अनाथ मुलाना भोजन दान असा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन लोखंडे परिवारांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं (आठवले) चे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनद पांडागळे हे होते व प्रमुख मार्गदर्शक म्हणून पन्नालाल भाऊ सुराना हे होते तर प्रमुख पाहुणो म्हणून जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी, मुख्याध्यापक अनिल सोनकांबळे (लातूर),बाल कल्याण समिती धाराशिवनचे सदस्य दयानंद काळूंके, रिपाइं (आठवले ) जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रिपाइं (आठवले) चे नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे, अणदुरचे माजी सरपंच प्रबोध कांबळे,आदी होते.
प्रारंभी कै.नारायण लोखंडे (आण्णा) यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आदरांजली वहाण्यात आली.त्यानंतर येथिल शालेम अनाथ विद्यार्थ्याना सह भोजन दान देण्यात आले. लोखंडे परिवारांच्या वतीने आपल घर येते राबविण्यात आलेल्य या उपक्रमा बाबत जेष्ठ समाजावादी नेते पन्नालाल भाऊ सुराना यानी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइं(आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यानी केले.
या प्रसंगी रिपाइंचे नळदुर्ग सर्कल प प्रमुख राजेंद्र शिंदे, प्रमाणित लेखापरिक्षक चंद्रकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जयभिम वाममारे, धर्मराज देडे, महादेव मोरे, राहुल लोखंडे, प्रा.नितीन लोखंडे,आरविंद लोखंडे,परमेश्वर लोखंडे,प्रदिप लोखंडे,विशाल लोखंडे, अंगद लोखंडे आपल घरचे विलास वकिल,एस.आर.चवले सह विदयार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.