spot_img
24 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त धाराशिव येथे भव्य बुद्धीमंथन स्पर्धा

 

श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनचा बुद्धीमंथन सोहळा

३० हजारांचे रोख पारितोषिके, ट्रॉफी व मेडल्स देणार विविध वयोगटांसाठी स्पर्धा

धाराशिव प्रतिनिधी :-

बुद्धिमत्तेचा, संयमाचा आणि दूरदृष्टीचा जागतिक स्तरावर सन्मान मिळवलेल्या बुद्धिबळ खेळाच्या जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यात बुद्धीमंथन या भव्य रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी २० जुलै रोजी डीआयसी रोड छत्रपती संभाजी महाजारनगर येथील श्री सिद्धिविनायक परिवार हॉल येथे ही स्पर्धा पार पडणार असून, सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर संध्याकाळी ७ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन श्री सिद्धिविनायक परिवार, धाराशिव जिल्हा बुद्धिबळ संघटना, जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून विद्यार्थ्यांच्या विवेक, संयम व निर्णयक्षमता वृद्धिंगत करणारे प्रभावी माध्यम आहे. बुद्धीमंथन उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाला चालना मिळेल. त्यामुळे अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि असोसिएशन चे जावेद शेख यांनी केले आहे.खुला गट अंडर-१९ अंडर-१५ अंडर-११ या गटांमध्ये होणार स्पर्धा पार पडणार आहेत. स्पर्धेसाठी एकूण ३० हजार रुपयांची रोख पारितोषिके, आकर्षक ट्रॉफी, मेडल्स व स्मृतिचिन्हे ठेवण्यात आली आहेत.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या