spot_img
5.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग ग्रामीण भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी विक्रांत दुधाळकर यांची निवड

अणदूर, प्रतिनिधी – (दि.१७ जुलै)
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील नळदुर्ग ग्रामीण भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अणदूर येथील विक्रांत दुधाळकर यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, परिसरात आनंदाची लाट उसळली आहे.
विक्रांत दुधाळकर हे तरुण, कार्यशील आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व असून, विशेष म्हणजे ते हिंदुत्व विचारसरणीच्या खंबीर नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांनी आजवर समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम करत रामनवमी उत्सवाचे यशस्वी आयोजन आणि ३०,००० झाडे लावण्याचा संकल्प यांसारखे उल्लेखनीय उपक्रम हाती घेतले आहेत. पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक जपणूक याचा त्यांनी समतोल साधला आहे.
या निवडीबाबत भाजप नळदुर्ग मंडळाच्या अध्यक्षा सौ. रंजना राठोड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “दुधाळकर यांचे विचारपूर्वक नेतृत्व युवा पिढीला राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी मूल्यांकडे घेऊन जाणारे ठरेल. पक्षासाठी ही निवड निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.”
या निवडीनंतर विक्रांत दुधाळकर यांनी पक्षश्रेष्ठींप्रती आभार मानले असून, स्थानीक युवकांचे संघटन, समाजाभिमुख उपक्रम आणि हिंदुत्व विचारसरणीचा प्रसार यासाठी सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या