मुरुम प्रतिनिधी –
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आगारात नवीन आलेल्या 5 बसेस पैकी एका बसेसचे पूजन प्रतिभा निकेतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम यांच्या विनंतीला मान देऊन उमरगा आगारप्रमुख प्रसाद कुलकर्णी, वाहतूक निरिक्षक अभिमन्यू सरवदे व प्राचार्य उल्हास घुरघुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा भुयार चिंचोली मार्गे मुरूम बस सेवा पूर्ववत चालू करण्यात आली.प्रा.गिरी संजय यांच्या हस्ते नवीन लाल परीचे मुरूम येथे पूजन करण्यात व मोठया उत्साहात स्वागत करण्यात आला.
याप्रसंगी मुरूम बस स्थानक प्रमुख अमरसिंग रजपूत, प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक मुरूम विद्यालयातील प्रा.अण्णाराव कांबळे , सोलंकर नारायण, प्रा.अजित सूर्यवंशी प्रा.अमोल गायकवाड, प्रा, दीपक सांगळे, प्रा. राघवेंद्र धर्माधिकारी, फिरोज कागदी,राजू कोळी, माजी वाहक मुदखण्णा सुरेश,विद्यार्थिनी माही, महेश चव्हाण व वैष्णवी संजय जाधव पत्रकार महेश निंबरगे,पत्रकार रामलिंग पुराणे,तसेच मुरूम येथील नागरिकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता.
उमरगा आगारातील कर्तव्य बजावत असलेले चालक सिद्धू बंदीछोडे व वाहक सतीश सूर्यवंशी यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले.