spot_img
15.4 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून महावीर जालन यांचा गौरव

 

ईट ता.१३(बातमीदार) :-

सान्वी फाऊंडेशन गिरवली (ता.भूम) यांच्या वतीने दिला जाणारा सन-२०२५-२०२६ या वर्षीचा “उत्कृष्ट पत्रकार” पुरस्कार यंदा दै. सकाळ चे पत्रकार महावीर जालन यांना देण्यात आला. विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या कार्यक्रमात शनिवारी (ता. बारा) रोजी सकाळी १० वाजता लोकसेवा हायस्कूल गिरवली येथील खुल्या मैदानात मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्यात लोकाभिमुख पत्रकारिता करत समाजातील विविध घटकांचा आवाज बनणाऱ्या बातमीदार म्हणून महावीर जालन यांचा सन्मान करण्यात आला.हा पुरस्कार माजी आमदार राहुल मोटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर मोटे, महानंदा डेअरी चे संचालक रणजित मोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश सोंन्ने यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.पुस्तक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करत सन्मानित करण्यात आले. सामाजिक विषयांना धरून सातत्याने केलेल्या बातमीदारीचा हा गौरव सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या साक्षीने पार पडला.यावेळी सुषमा थोरात, संजय मोटे, समाजसेवक बाळासाहेब खरवडे, शहाजी सोंन्ने , नानासाहेब डोके,प्रा.डॉ. कैलास मोटे, डॉ. कृष्णा सातपुते, मुख्याध्यापक हरिदास डोके, जगदीश चौधरी ,बाबा गवळी,जावेद पठाण,खंडेराव ढोपे ,दस्तगिर पठाण, आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन नानासाहेब डोके यांनी केले तर आभार हरिदास डोके यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या