धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. रामलिंग पुराणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संस्थानाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले,कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,प्रिसीजन ग्रुप, पुणे चेअरमन तथा कार्यकारी संचालक यतीन शहा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरवीण्यात आला.
श्री गुरुपौर्णिमा व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. ७/०७/२०२५ सोमवार रोजी अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात डॉ. रामलिंग पुराणे यांच्या सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ‘गुणीजन गौरव’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवीण्यात आले. डॉ. पुराणे यांच्या सर्वसमावेशक सामाजिक कार्यावर पकड मजबूत असून, समाजातील तळागाळातील वंचीत समाजाच्या हक्कासाठी त्यांचा लढा कायम आणि सातत्याने असते, गाव,तालुका, जिल्हा, राज्य, देश पातळीवर त्यांचे आतापर्यंत पन्नासहून अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत. त्याचीच दखल घेऊन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट संस्थानाच्या कतीने “गुणीजन गौरव ” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उल्हास घुरघुरे, श्रीकांत बेंडकाळे, पंडित मुदकण्णा, प्रदीप शेळके, अमित ढाले, शुभम पुराणे आदी उपस्थित होते.



                                    
