मुरूम प्रतिनिधी ता. २६,
मुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठान अखिल भारतीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट संस्थाच्या वतीने त्यांना “गुणीजन गौरव” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने गुरुपौर्णिमा १९८८ पासून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, एफ/२२७९ अक्कलकोट हे धर्मादाय न्यास कार्यरत आहे. येथे परगावच्या स्वामी भक्तांना दैनंदिन अन्नदानाचे महाप्रसाद देण्याचे स्वामीकार्य गेली ३७ वर्ष करीत आहे. श्री गुरुपौर्णिमा व न्यासाच्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या २६ वर्षापासून संपन्न होत असून यावर्षीचा कालावधी दि.३० जुन २०२५ ते ९ जुलै २०२५ पर्यंत आहे.
श्री गुरुपौर्णिमा व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. ७/०७/२०२५ सोमवार रोजी सायं ६:३० वा. अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘गुणीजन गौरव’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याचे पत्र डॉ. रामलिंग पुराणे यांना मंडळाच्या वतीने पाठवण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी डॉ. पुराणे यांच्या सामाजिक कार्याबद्दल वर्गमित्र खंडेराव व्हडले यांनी मंडळाकडे शिफारस केली होती.