spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी…

 

 

मुरूम, ता. उमरगा, ता. २१ ( प्रतिनिधी) :-

येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेने गेल्या पंधरा वर्षात एकदाही निवडणुक झाली नाही. सलग तीन टर्म बिनविरोध संचालक मंडळ निवडून येऊन कार्यरत राहिले. प्रथमच या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली. शनिवारी (ता. २१) रोजी प्रतिभा निकेतन विद्यालय मतदान केंद्रात दुपारी चार वाजेपर्यंत मतदान पार पडले. मतदानानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मत मोजणीला प्रारंभ करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी बी. व्ही. काळे यांनी निकाल जाहीर केला. महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनलने दणदणीत विजय मिळविला. या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार अधिक मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महात्मा बसवेश्वर पतसंस्था सभासद विकास पॅनल व महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनल हे आमने-सामने निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही पॅनलने निवडणूक कालावधीमध्ये एकमेकांसमोर आरोप-प्रत्यारोप करत निवडणूक लढविली. परंतु विद्यमान संचालकावर मतदारांनी अधिक विश्वास ठेवून या निवडणुकीत प्रतिस्पर्धी पॅनलला पराभूत केले. या निवडणुकीत महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख चंद्रशेखर मुदकण्णा व विद्यमान चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली. या निवडणुकीत सर्वसाधारण मतदार संघातून जाधव कमलाकर काशीनाथराव, पाटील बाबासाहेब मल्लिनाथ, बिराजदार श्रीशैल सिद्रामप्पा, मुदकण्णा मनिष लिंबणप्पा ,मुदकण्णा शरणप्पा सिद्रामप्पा, वरनाळे अमृत भिमराव, वरनाळे शिवशरण गुरुलिंगप्पा, समन शिवराज हुवण्णा, सर्वसाधारण महिला राखीव मतदार संघातून जाधव संगीता अशोक, सोनवणे वंदना भागवत, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून लोखंडे इंद्रजित सिद्राम, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून बोंदर मनोज मारुती तर इतर मागासवर्गीय मतदार संघातून हिरमुखे अनंत सायबण्णा हे विमान चिन्ह घेऊन १३ पैकी १३ जागेवरती निवडून आले आहेत. विजयी पॅनलचे विमान चिन्ह म्हणजे विकास, वेग आणि विश्वास यावर मतदार राजाने विश्वास ठेवून सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले. तर प्रतिस्पर्धी महात्मा बसवेश्वर पतसंस्था सभासद विकास पॅनलचे प्रमुख बसवराज वरनाळे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवडणूक लढविण्यात आली होती. पराभूत उमेदवारमध्ये गायकवाड आप्पाराव शिवाजी, तुगावे शिवानंद भोजप्पा, पठाण मन्नान मूर्तझाखान, बिराजदार गुंडप्पा चन्नप्पा, मुदकण्णा बसवराज रामचंद्र, वरनाळे बसवराज गुरुलिंगप्पा, शिंदे रविराज नारायण, शिरसे दत्तात्रय शंकर, कंटेकुरे शिवलीला विकास, हत्तरगे मिनाक्षी सिद्धाराम, बोडरे मारुती सुभाना, घोडके संतोष मोतीराम, स्वामी योगेश कपिलेश्वर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निकाल जाहीर झाल्यानंतर नूतन संचालक, सभासद व कार्यकर्त्यांनी जल्लोष-घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करून गुलालाची उधळण करून अतिशबाजी केली. दरम्यान माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उमरगा येथील कार्यालयात सर्व नूतन संचालकांचा ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, भिमराव वरनाळे ॲड. आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फोटो ओळ : उमरगा ता. उमरगा येथे ज्ञानराज चौगुले यांच्या कार्यालयात सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करताना ज्ञानराज चौगुले, आकांक्षा चौगुले, भिमराव वारनाळे, शिवशरण वरनाळे व अन्य.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या