spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा…

मुरुम, ता. उमरगा, ता. २१ (प्रतिनिधी) : –

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवारी (ता. २१) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सहा वाजता उमरगा येथील योगगुरू देवराज गरड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा भाजप नेते बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी योग व प्राणायाम करून विशेष सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, रोटरी क्लब मुरूम सिटी चे अध्यक्ष कमलाकर मोटे, रशिद शेख, गोविंद पाटील, श्रीकांत बेंडकाळे, सुरेश शेळके, साई टाचले, गणेश अंबर, सुधीर चव्हाण, सुजित शेळके, अनुराधा जोशी, सच्चिदानंद अंबर, डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. राजेंद्र गणापुरे, डॉ. राम बजगिरे, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेऊन योगाचे धडे घेतले. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. कार्यक्रमाचा उद्देश सर्वसामान्यांमध्ये योगाची जागरूकता वाढवणे व निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा होता. योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या योग दिनाची थीम म्हणजे योग फॉर सेल्फ अ‍ॅण्ड सोसायटी (स्वतःसाठी आणि समाजासाठी योग) यावेळी शहरातील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, प्रतिभा निकेतन विद्यालय, विविध संघटनांचे पदाधिकारी, योग प्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर योगा व प्राणायाम करताना योगगुरु, मान्यवर, कर्मचारी वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी व अन्य.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या