spot_img
13 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

बिरदेव डोणे यांनी घेतले आई तुळजाभवानी देवीचे दर्शन

तुळजापूर / प्रतिनिधी :-

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावचे सुपुत्र बिरदेव सिद्धप्पा डोणे यांनी नुकतीच यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत ५५१ वा क्रमांक मिळवला आहे. या यशानंतर त्यांनी आज (दि.१५ जून) रोजी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. देवीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आपले यश तिच्या कृपेचे फलित असल्याचे नमूद केले. प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून साधलेल्या या यशाचे देशभरातून कौतुक होत आहे.

बिरदेव डोणे यांची पार्श्वभूमी अत्यंत साधी असून, ग्रामीण भागात वाढलेले असतानाही त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळाली असून, एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून ते उभे राहिले आहेत.

मंदिर संस्थानच्या वतीने बिरदेव डोणे यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या