spot_img
20.9 C
New York
Thursday, August 7, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

स्व. माधवराव (काका) पाटील यांची पुण्यतिथी मुरुम शहरात साजरी

मुरूम , ता. उमरगा (प्रतिनिधी) :-

स्व. माधवराव उर्फ काका पाटील यांनी उमरगा-लोहारा तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला जोखून देऊन मोठ्या मेहनतीने उभी केलेली साखर कारखानदारी, शिक्षणसंस्था या भागातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक राबविलेल्या जलसिंचनाच्या लहान-मोठ्या पाणी योजना, बेनीतुरा मध्यम प्रकल्पाची उभारणी त्यातून झालेला कृषी, सहकार व औद्योगिक विकास. दरम्यान या परिसरात कुठलाही साखर कारखाना नसल्याने काकांनी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे हाल व खाजगी साखर कारखानदार यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सहकारी तत्वावरील मुरूमच्या माळरानावर श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला पाहिजे. म्हणून साखर उद्योग उभारण्याचे ठरवून विकासाची पहिली मुहूर्तमेढ सन १९९४ साली विठ्ठलसाईच्या रूपाने रोवली गेली. साखर कारखान्याच्या अगोदर काकांनी सन १९७० मध्ये नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम या शिक्षण संस्थेचा पाया रचला. पुढे त्यांचे जेष्ठ चिरंजीव माजी मंत्री बसवराज पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी त्यावर कळस चढविला. तसेच युवा नेते जनता सहकारी बॅकेचे चेअरमन शरण पाटील हे वडीलांचा व काकांचा आदर्श घेऊन पुढे त्यांच्या विचारसरणीनुसार कार्यतत्पर राहून वाटचाल करीत आहेत. प्रारंभी स्व. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्व. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मंगळवारी (ता.२०) रोजी बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, विठ्ठल साई कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, माणिक राठोड, श्रमजीवी शिक्षण संस्थेचे संचालक रामकृष्णपंत खरोसेकर, मल्लिनाथ दंडगे, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, ॲड. संजय बिराजदार, ॲड. व्ही. एस. आळंगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशीद शेख, धनराज पाटील, पप्पू सागर, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. राम सोलंकर, उल्हास घुरघरे, डॉ. शौकत पटेल, सलीम जमादार आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन विद्यालय, मुरुम तसेच विठलसाई सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
फोटो ओळ : स्व. माधवराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करताना बापूराव पाटील, शरण पाटील, रामकृष्णपंत खरोसेकर, व्यंकटराव जाधव गुरुजी, दिलीप भालेराव, दिलीप गरुड आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या