spot_img
18.8 C
New York
Friday, September 12, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

कु.प्रतीक्षा गळाकाटे हिने शालांत परीक्षेत मिळविले 97.80 टक्के गुण

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत केले यश संपादन.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
इटकळ (दिनेश सलगरे):-

वडील मेंढपाळ आई मोलमजुरी अत्यंत गरीब कुटुंबातील कु.प्रतीक्षा गळाकाटे हिने जिद्द चिकाटी मेहनत सातत्य व आत्मविश्वास मनी बाळगत शालांत परीक्षेत 97.80 टक्के गुण घेत उज्वल यश संपादन केले.अणदूर येथील जवाहर विद्यालयात शिकणारी कु. प्रतिक्षा विश्वनाथ गळाकाटे ही एका गरीब कुटुंबातील मुलगी असून तिची आई मोलमजुरी करते व वडील मेंढपाळ करतात. जिद्द, चिकाटी व अभ्यासाच्या जोरावरती या विद्यार्थिनीने घरात ही आईना घरकामात मदत करीत अभ्यासाची कास सोडली नाही सातत्य पूर्ण अशा अभ्यासामुळेच हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे प्रतीक्षा हिने अवघड अशा इंग्रजी विषयांमध्ये 97 गुण घेऊन अणदूर केंद्रात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. खरंतर ती लेखी परीक्षेमध्ये 482 गुण घेऊन जवाहर विद्यालयात द्वितीय आहे. दहावीनंतर तिला विज्ञान शाखा घेऊन जेईई या परीक्षेची तयारी करायची आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व ज्ञानसागर कोचिंग क्लासेस चे संचालक युवराज करपे सर व नागनाथ मुळे सर यांनी अभिनंदन व कौतुक केले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या