अतनुर ता.जळकोट (प्रा.सुधीर पंचगल्ले)
तालुक्यात भाजप प्रणित सरकारने सत्तेत बसण्यासाठी वचनामा जाहीर केला होता. त्या *जाहीरनामाची सरसकट अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली* शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. व लाडक्या बहिणींना २१०० रुपये अनुदान देण्याची जाहीर केले होते. शेतातील व घरगुती वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांनी बँकेचे घेतलेले कर्ज माफ करण्याऐवजी बँकेने कर्जधारक शेतकऱ्यांना त्रास देण्याची काम चालू आहे. आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला कुठल्याही प्रकारचा हमीभाव दिला जात नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तरी सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, त्याबद्दल कर्ज वसुली सक्तीची करण्यात येत असून ती करण्यात येऊ नयेत. सततच्या कर्ज वसुलीमुळे शेतकऱ्यांना मागे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जापोटी आत्महत्या चा मार्ग अवलंबित असून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून तात्काळ कर्ज वसुली थांबण्यात यावी व कर्जमाफी देण्यात यावी. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यात यावे. शेतीतील व घरगुती वीज बिल माफ करण्यात यावे. घरकुल यांच्या लाभार्थ्यांना वाळू मोफत वाटप करण्यात यावी. घरकुलाच्या अनुदान त्वरित देण्यात यावे, अन्यथा *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या* उपस्थित जळकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनानुसार मागणी मान्य नाही झाल्या तर तहसील कार्यालय जळकोट समोर समोर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विकास गोविंदराव सोमुसे-पाटील अतनूरकर, , , शंकर धोंडापुरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख सत्यभामा कदम, शहर प्रमुख नितीन धूळशेटे, सोपा शंकर सावकार, सारंग आगलावे, प्रियंका बोळेगावे, विकास कापसे, सुभाष गुंडिले, नितीन भाऊ शेट्टी, शंकर सोपा, विश्वनाथ महाराज, बाळू पाटील, लड्डू संगेवार, हिंगणे गुरुनाथ, राम जडीतकर, बाबू कदम, माधव सोमसे, कापडे, गोविंद बारसुळे, कापसे नवनाथ, गोळेगाव शंकर, भोळे गाव कदम, सत्यभामा कदम, भीमराव ढवळे, शंकर धोंडापुरे, संंगेवार प्रमोद, सारंग आगलावे, वेंकट शिनगारे, नारायण कळसे, बसवराज नाईकवाडे, सुरेंद्र साळुंखे, शिवचंद्र थोटे, सदानंद पांचा ळ, शिवशेट्टी बालाजी, गजानन बादुर्ग, अशोक पांचाळ, संभाजी थोटे, ज्ञानोबा रावन गुप्ते यांच्या निवेदनावर सह्या आहेत.