अणदूर प्रतिनिधी :-
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील विविध क्षेत्रातील गुणवंतांना १० एप्रिल रोजी बाभळगाव भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून,लातुर येथील युवा सिंगर विजेता महाराष्ट्र राज्य शिवशाहीर संतोष साळुंके, सोलापूर येथील अपोलो फर्टीलिटीच्या सचिवा डॉ किर्ती कटारे, जेष्ठ साहित्यिक व कवी प्रा डॉ अरविंद हंगरगेकर, कलाकार तानाजी देशमुख,सरपंच सुरेखाताई कांबळे, उपसरपंच पल्लवी चव्हाण, भिमराव पाटील, नागनाथ धरणे,प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
———————————————————
यावेळी सेवानिवृत्ती निमित्त प्रा देवदत्त आनंदराव पाटील, दत्तात्रय भिमराव कांबळे,राम मुकुंदा चव्हाण, ज्ञानेश्वर भिमराव महाबोले यांचा तर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले डॉ विष्णु विठ्ठल सातपुते, डॉ अभिषेक देवदत्त पाटील, डॉ अभिनंदन दयानंद काळुंके, डॉ प्राजक्ता गोविंदराव पाटील यांचा, भारत सरकार नोटरी प्राप्त विधिज्ञ ॲड किशोर नरहरी पाटील,उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल अविनाश नागनाथ धरणे,तर पोलीस खात्यात कार्यरत असलेले अक्षय प्रभाकर जाधव या गुणवंताचा बाभळगाव भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी शिवशाहीर संतोष साळुंके यांनी पोवाडा, तर कवी डॉ अरविंद हंगरगेकर,यांनी ग्रामीण शेतकरी कविता तर तानाजी देशमुख यांनी विविध मेमग्री सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद काळुंके यांनी, प्रास्ताविक डॉ संतोष पवार यांनी तर आभार संभाजीराव पाटील यांनी मानले
यासाठी अमर पाटील, अशोक जाधव, जितेंद्र पाटील, विक्रांत पाटील,नितीन कांबळे,संभाजी चव्हाण,प्रा नेताजी बिराजदार,राम सातपुते,मेघराज जाधव, सत्तेश्वर बिराजदार,शामराव धनवडे, बसवेश्वर परकाळे,अनिल पाटील,सागर पाटील,पुष्पक कसबे,यांच्यासह समस्थ ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता