धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) –
धाराशिव शहरात गुटखा, मावा, ऑनलाईन चक्री जुगार, मटका,शिंडी, आदींसह इतर विविध प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरू आहेत. या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या अवैध धंद्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत तर काहींना आपला जीव गमावू लागला आहे तर अनेक कुटुंबीय जिल्हा होत आहेत. मात्र त्याकडे पोलिसांची जाणीवपूर्वक डोळे झाकत आहे, त्यामुळे संबंधितावर कारवाई करणे अपेक्षित व आवश्यक आहे. मात्र पोलिसांनी दि.०८ एप्रिल रोजी थातूरमातूर कारवाई करुन गुटखा जप्त केल्याची कागदपत्रे रंगविली. मात्र…जो तळे राखतो तो त्या तळ्यातीलच पाणी पितो….याप्रमाणे जुजबी कारवाई करून उर्वरित ठिकाणी कारवाई न करण्यासाठी का पावले उचलली नाहीत? या माध्यमातून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला रेट (मंथली) वाढवण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे एस पी साहेब, तुम्ही अशा अधिकाऱ्याची चौकशी करणार ? असा प्रश्न नागरिकांत उपस्थित झाला आहे.
धाराशिव शहरातील सावरकर चौक येथे असलेल्या जयेश किराणा दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा व तत्सम पदार्थ डायरेक्ट पान मसाला, विमल पान मसाला, राजनिवास पान मसाला, व्ही 1 तंबाखू व गोवा गुटख्याचे पुडे ७३ हजार रुपये तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या सूर्यकांत पेट्रोल पंपास समोरील साईबाबा ट्रेडर्स किराणा दुकानात गुटखा व तत्सम पदार्थ ३८५४९ रुपयांचा अवैध माल ओमकार भानुदास वाघमारे ओंकार भानुदास वाघमारे व पवन प्रकाश कदम यांच्या दुकानातून जप्त केला. वास्तविक पाहता त्या ठिकाणी लाखोंचा गुटखा पडलेला असून केवळ कारवाई करून इतर दुकानदारांकडून मंथली वाढवून घेण्याच्या हट्टा पायी किरकोळ गुटखा दाखवून भले मोठे तिर मारल्यासारखे भासवत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे,शहरात अशा प्रकारे अनेक अवैद्य धंदे खुलेआम सुरू आहेत.मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे,विशेष म्हणजे ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. त्या कर्मचाऱ्यांच्या हद्दीत देखील मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे अवैध धंदे जोरात सुरू आहेत. त्यापैकी फक्त एक, दोघांवरच कारवाई केली असून उर्वरित अवैध धंदेवाले मोकाट सोडून दिले आहेत. त्यामुळे या कारवाईवरच संशयाची सुई फिरत आहे. तर काही विक्रेते व अवैध व्यावयाय करणारे संबंधित अधिकाऱ्याचा रेट वाढविण्यासाठी आमच्याकडे तगादा लावला जात असल्याचे दबक्या आवाजात बोलत आहेत.