spot_img
17.1 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

समाजवादी पार्टीच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी रोचकरी तर युवा तालुकाध्यक्षपदी जाधव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

तुळजापूर प्रतिनिधी :-

समाजवादी पार्टीच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा (भैय्या)देवानंद रोचकरी यांची तर तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे राहुल बाळासाहेब जाधव यांची नुकतीच युवा तालुकाध्यक्षपदी निवड झालेबद्दल येथील नळदुर्ग रोडवरील राज सिरॅमिक ॲन्ड बिल्डिंग मटेरियलचे सर्वेसर्वा सेवानिवृत्त प्राध्यापक राजेंद्र घाडगे यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

समाजवादी पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा प्रा.राजेंद्र घाडगे यांनी व्यक्त करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*जनहितार्थ कामांना प्रथम प्राधान्य*
यावेळी खाजगीत उपस्थितांशी संवाद साधताना समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा रोचकरी म्हणाले की,समाजवादी पार्टीच्या माध्यमातून पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार तसेच जनहितार्थ कामांना व सर्वसामान्यांनाचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्रा. राजेंद्र घाडगे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या)रोचकरी, उद्योजक गणेश पुजारी, अप्पासाहेब घोडके, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव,विष्णू सुर्यवंशी, माजी सैनिक पवार,सिध्दु इंगोले, बालाजी वटणे,आबा पुजारी, अक्षय कोरेकर, कुणाल गायकवाड,जयराज घाडगे, तात्या लबडे,सुनिल वाडकर, शुभम वाडकर,पी.आर.कदम, आदित्य घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -
Previous article
नळदुर्ग दि ५ (प्रतीनिधी) नळदुर्ग अणदूर जळकोट व परिसरातील अनेक गावांतील नागरिकांच्या सोयी करता नळदुर्ग या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. अपेक्षित तालुका नळदुर्ग अणदूर जळकोट व परिसरातील अनेक गावातील नागरिकांना तालुकास्तरीय कामासाठी तुळजापूर या ठिकाणी जावे लागत असे. जळकोट महसूल मंडळ आणि नळदुर्ग महसूल मंडळ यांच्या अखत्यारित येणाऱ्या तलाठी कार्यालयातील संदर्भित कामासाठी आता तुळजापूर या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. अप्पर तहसीलदार अभिजीत जगताप यांनी नळदुर्ग येथे तलाठी व कोतवाल यांची संयुक्त बैठक घेऊन ही माहिती दिली आहे. सध्या या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत पुढे चालून या कार्यालयासाठी दोन ते तीन पदांना कायमची मंजुरी असून नियमित वेतनश्रेणीवर वाढीव पदे मंजूर करण्याची विनंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वरील महसूल मंडळातील वेगवेगळ्या कार्यालयीन कामकाजासाठी प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने या भागातील नागरिकांना आता तुळजापुरला न जाता वेळ खर्चाची बचत होऊन फायदा होणार आहे अशी माहिती तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी दिली आहे. तसेच आता कोणत्याही महसूल प्रमाणपत्र दाखले व इत्यादी कामांसाठी तुळजापूर या ठिकाणी न जाता नळदुर्ग येथील अप्पर कार्यालयाचा फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
Next article

Related Articles

ताज्या बातम्या